-->
कोऱ्हाळे येथे शारदानगरच्या कृषिकन्यांचे आगमन

कोऱ्हाळे येथे शारदानगरच्या कृषिकन्यांचे आगमन

कोऱ्हाळे बुद्रुक - प्रतिनीधी
शारदानगर येथील कृषी व्यवसाय- व्यवस्थापन महाविद्यालयांच्या कृषिकन्या कोऱ्हाळे बुद्रुक येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमासाठी दाखल झाल्या आहेत.
चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थिनी ऐश्वर्या दबडे,साक्षी घुले, मयुखी माहुलकर,अंजली पवार व मानसी राऊळ कोऱ्हाळे बुद्रुक बारामती ह्या गावात शेतकऱ्यांना शेती-विषयक मार्गदर्शन करण्यासाठी यांचे आगमन झाले आहे.
        महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी  अंतर्गत कृषी व्यवसाय-व्यवस्थापन महाविद्यालय बारामती ह्यांच्या  शैक्षणिक अभ्यासक्रमांनुसार सात आठवडे चालणारा हा ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम आहे. ह्या साठी कृषी, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रा मधील अग्रगण्य व सोयी सुविधांनी परिपूर्ण असलेल्या कोऱ्हाळे बुद्रुक गावाची निवड कृषी कण्यांनी केली आहे. 

             या प्रसंगी सरपंच रवींद्र खोमणे, ग्राम विकास अधिकारी राजेंद्र शिंदे यांची भेट घेण्यात आली.  एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे, प्राचार्या जया तिवारी, कार्यक्रम अधिकारी मयूर पिसाळ, कार्यक्रम समन्वयक नीलकंठ जांजिरे, प्रा. शिवानी कोकरे देसाई, प्रा. अभिषेक गाढवे ह्यांच्या मार्गदर्शना खाली हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article