सुंदर बैल आमचा ताब्यात द्या...... गौतम काकडे यांना अटक करा मागणीसाठी वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन बाहेर बैलगाडा शर्यत प्रेमींची मोठी गर्दी; पोलिसांचे शांतता राखण्याचे आवाहन
Saturday, June 29, 2024
Edit
वडगांव निंबाळकर: बारामती तालुक्यातील वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत परवा रात्री ११ वाजता फलटण येथील प्रसिद्ध करण्यात गाडामालक रणजीत निंबाळकर सर यांच्यावर निंबुत येथे प्राणघातक हल्ला झाला होता. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे.


ज्या बैलासाठी हा हल्ला झाला तो सुंदर बैल आमच्या ताब्यात द्या अन्यथा पोलीस स्टेशन येथे आणा व गौतम काकडे यांना लवकरात लवकर अटक करा अशी मागणी रणजीत निंबाळकर सर यांच्यावर प्रेम करणाऱ्या वर्गाने केली असून वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन बाहेर बैलगाडा प्रेमींनी गर्दी केली आहे.
याप्रकणी गौतम काकडे, गौरव काकडे, शहाजी काकडे यांच्यासह इतर ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील गौरव काकडे, शहाजी काकडे यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना १ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यामधील गौतम काकडे व इतर ४ जण फरार असून पोलिसांची पथके त्यांचा मागावर आहेत.
हल्ला झालेले रणजीत निंबाळकर यांचा उपचारादरम्यान रात्री २ वाजता मृत्यू झाला आहे.
डीवायएसपी डॉ. सुदर्शन राठोड व पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले असून आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी आम्ही कटिबध्द असल्याचे सांगितले आहे. व उर्वरित आरोपींना लवकरात लवकर अटक करू असे सांगितले आहे.
महिलांनी फोडला हंबरडा
उपचारादरम्यान रणजीत निंबाळकर यांचा मृत्यू झाला असून महिलांनी अक्षरशः हंबरडा फोडला.