-->
बैलगाडा क्षेत्रात मोठी खळबळ : बैल खरेदी प्रकरणावरून निंबुत येथील गोळीबारात रणजित निंबाळकर सर गंभीर जखमी ; गौतम काकडे, गौरव काकडे पोलिसांच्या यांना अटक

बैलगाडा क्षेत्रात मोठी खळबळ : बैल खरेदी प्रकरणावरून निंबुत येथील गोळीबारात रणजित निंबाळकर सर गंभीर जखमी ; गौतम काकडे, गौरव काकडे पोलिसांच्या यांना अटक

 


बारामती - शर्यतीच्या बैल खरेदीच्या व्यवहारावरून गोळीबार झाला आहे. निंबुत येथे हा गोळीबार झाला. यामध्ये रणजित निंबाळकर गंभीर जखमी झाले असून त्यांचा डोक्यात गोळी लागली असून ते गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत.  

   याप्रकरणी अकिंता रणजित निंबाळकर  यांनी वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून गौतम शहाजी काकडे, गौरव शहाजी काकडे व इतर 3 अनोळखी लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     27/6/2024 रोजी रात्री 11/00 वा. चे सुमारास निंबुत येथील गौतम काकडे यांच्याघरासमोर हा गुन्हा घडला आहे.  

सविस्तर हकीकत अशी की, रणजिंत निंबाळकर यांनी  गौतम काकडे यांना सुंदर नावाचा बैल विक्री केला होता.

     37 लाख रूपये ला तो विकला होता. त्यापैकी 5 लाख हे विसार म्हणून दिले होते तरी उर्वरीत रक्कम दिनांक 27/6/2024 रोजी नेण्यासाठी बोलाविल्याने त्यांचे घरी निंबुत येथे रात्री  11/00 वा. चे सुमारास मी, माझे पती रणजित, मुलगी अंकुरण वय 10 महीने, हे मौजे निंबुत येथे गौतम काकडे यांनी माझे पतीस जिवे मारण्याचे उद्देशाने बोलविले होते. 

        गौतम काकडे हे रणजित निंबाळकर याना म्हणाले की,  तुम्ही संतोष तोडकर यांना ‘मी तुम्हाला पैसे दिले नाहीत असे का सागिंतले? तुम्ही असे बोलायला नको होते’ मी तुम्हाला सकाळी पैसे देतो. तुम्ही आता स्टॅम्प पेपरवर सही करा असे बोलले. त्यावेळी माझे पती त्यांस तुम्ही माझे राहीलेले पैसे दया मी लगेच सही करतो आणि जर तुम्हाला व्यवहार पुर्ण करायचा नसेल तर तुमचे 5 लाख रूपये मी तुम्हाला परत देतो, माझा बैल मला परत दया असे बोलले. 

           त्यानंतर आम्ही आमचे गाडीकडे निघालो. त्यावेळी गौतम काकडे माझे पतीस ‘तु बैल कसा घेवुन जातो तेच मी बघतो’ असे म्हणुन त्यांनी फोन लावुन पोरांनो तुम्ही वर या असे सांगितले. त्यानंतर त्यांनी त्यांचा भाउ गौरव यास देखील फोन करून बोलावुन घेतले. गौरव व अनोळखी 3 मुले तिथे आल्यावर गौतम काकडे हे आमच्याकडे पळत आले. व त्यांनी  गौरव व त्या अनोळखी 03 मुलांना ” हया सराला मारा लय बोलतोय हा “ असे म्हणाला. त्यावेळी गौरवच्या हातात काठी होती, ती काठी गौतम काकडे यांनी घेवुन तो मारण्यासाठी माझे पतीचे अंगावर धावुन जावून शिवीगाळ केली, त्यावेळी वैभव कदम हे गौतम काकडे यांना ” तुम्ही वाद घालु नका आपण उदया व्यवहारावर चर्चा करू “ असे म्हणुन त्यांना आडवत होते. 

          अनोळखी 03 पोरांनी आम्हाला शिवीगाळ करीत असतांना गौरवने ” तु बैल कसा नेतो तुला जिवंत ठेवतच नाय “ असे म्हणुन त्याचेकडे असणारे पिस्तुलमधुन माझे पतीच्या डोक्यात 1 गोळी झाडली. गोळी लागताच माझे पती खाली पडले.म्हणून माझी वरील इसमांच्या विरूध्द कायदेशिर  फिर्याद आहे. पुढील तपास स.पो.नि.श्री राहुल घुगे हे  करीत आहेत.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article