-->
बैलगाडा शर्यत प्रेमींवर शोककळा : अखेर रणजित निंबाळकर सर यांचा उपचारादरम्यान मृत्यू : निंबूत येथे बैलाच्या खरेदीवरून डोक्यात घातली होती गोळी

बैलगाडा शर्यत प्रेमींवर शोककळा : अखेर रणजित निंबाळकर सर यांचा उपचारादरम्यान मृत्यू : निंबूत येथे बैलाच्या खरेदीवरून डोक्यात घातली होती गोळी

बारामती - बैलगाडा शर्यतीच्या बैलाच्या खरेदीवरून काकडे आणि रणजीत निंबाळकर यांच्यात झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्या वरती पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये रणजीत निंबाळकर हे गंभीर जखमी झाले होते. पुण्यातील रुबी रुग्णालयामध्ये त्यांच्या वरती उपचार चालू होते. दरम्यान आता उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे फलटण व बारामती तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली असून काकडे कुटुंबीयांवरती आता खुनाचा गुन्हा दाखल होणार आहे.

          बैलगाडा शर्यतीमध्ये नाव कमावलेल्या सुंदर बैलाच्या व्यवहारातून रणजीत निंबाळकर आणि काकडे यांच्यामध्ये खटका उडला होता. काकडे व निंबाळकर यांच्यामध्ये व्यवहारातील राहिलेल्या पैशातून वादविवाद चालू होते. दोन दिवसापूर्वी रणजीत निंबाळकर यांना काकडे कुटुंबीयांनी व्यवहार मिटवण्यासाठी स्वतःच्या घरी बोलावून घेतलं होतं. गौतम काकडे गौरव काकडे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी रणजीत निंबाळकर आणि त्याच्याबरोबर आलेल्या लोकांवरती हल्ला चढवला होता. 


        त्यातच स्वतःकडे असलेल्या पिस्तुलातून काकडे यांनी रणजीत निंबाळकर यांच्या डोक्यात गोळी झाडली होती. यामध्ये रंजीत निंबाळकर हे गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांना पुण्याला हरवण्यात आले मात्र काल रात्री रणजीत निंबाळकर यांचा उच्चार दरम्यान मृत्यू झाला. यामुळे आता काकडे कुटुंब आणि त्याच्या सहकाऱ्यांवरती 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल होणार आहे. दरम्यान रणजीत निंबाळकर हे नामांकित क्रीडा क्षेत्रातील तसेच शिक्षण क्षेत्रातील व्यक्तिमत्व असल्यामुळे फलटण व सातारा जिल्ह्यात त्यांचा दांडगा लोकसंपर्क होता. मुळे फलटण तालुक्यातही रणजीत निंबाळकर यांच्या मृत्युने हळहळ व्यक्त केली जात आहे.


           शहाजीराव काकडे यांचा मुलगा गौतम काकडे व फलटण येथील रणजित निंबाळकर यांचा शर्यतीच्या सुंदर नावाच्या बैलाचा घेवाण देवाणचा व्यवहार होता. त्यामुळे रणजित निंबाळकर हे काल दि. २७ रोजी रात्री निंबुत येथील गौतम काकडे यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यावेळी व्यवहारातून बाचाबाची होऊन झालेल्या भांडणातून गौतम काकडे यांचे भाऊ गौरव काकडे यांनी गोळीबार केला. यामध्ये निंबाळकर यांच्या डोक्यात गोळी लागल्याने त्यांना पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचरादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article