-->
बैलगाडा शर्यतीवरील काळा दिवस; शोकाकुल वातावरणात रणजीत निंबाळकर सर यांच्यावर अंत्यसंस्कार

बैलगाडा शर्यतीवरील काळा दिवस; शोकाकुल वातावरणात रणजीत निंबाळकर सर यांच्यावर अंत्यसंस्कार

फलटण - बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे यांच्या निंबुत येथील निवासस्थानी गुरूवारी रात्री रणजीत निंबाळकर यांच्यावर गोळीबार झाला होता. या गोळीबारात जखमी झालेल्या रणजित निंबाळकर यांच्यावर पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अयशस्वी ठरली अखेर तो काळा दिवस उजाडला रात्री 2 वाजता सरणी अखेरचा श्वास घेतला व उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.  
     मृत्यूची बातमी समजताच अंकिता निंबाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अक्षरशः हंबरडा फोडला.
     रणजीत निंबाळकर यांचे पार्थिव आज रात्री 8.30 वाजता त्यांच्या राहत्या घरी फलटण येथील तावडी गावात आणण्यात आले यावेळी असंख्य जनसमुदाय उपस्थित होता.
    यांच्यावर आज रात्री १० वाजता हजारो गाडामालकांच्या व  बैलगाडा शर्यत प्रेमिंच्या उपस्थित शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
         यावेळी सर्वांच्याच डोळ्यात अश्रू होते. सर गेल्याने बैलगाडा क्षेत्रावर शोककळा पसरली असून रणजीत सरांच्या जाण्याने बैलगाडा शर्यतीतील ही पोकळी भरून न निघणारी आहे.
सविस्तर घटनाक्रम असा की, फलटणचे (तावडी) येथे राहणारे रणजीत निंबाळकर सर यांनी शहाजीराव काकडे यांचा मुलगा गौतम काकडे यांना 'सुंदर' नावाचा बैल विकला होता.
         बैल विक्री करताना या विक्रीची किंमत ३७ लाख रुपये इतकी ठरली होती. त्यातील पाच लाख रूपये त्यांनी निंबाळकर यांना दिले होते, तर उर्वरित रक्कम घेण्यासाठी गुरूवारी (२७ जून) रात्री ११ च्या सुमारात रणजित निंबाळकर त्यांच्या पत्नी आणि मुलांसोबतच गौतम काकडे यांच्या निवासस्थानी गेले होते.

         गौतम काकडे यांनी, "मी तुम्हाला पैसे दिले नाहीत, असं तुम्ही संतोष तोडकर यांना का सांगितलं? तुम्ही असे बोलायला नको होते, तुम्ही आता स्टॅम्प पेपरवर सही करा. मी तुम्हाला सकाळी पैसे देतो." असे म्हटले. त्यावर रणजित निंबाळकर म्हणाले, तुम्ही माझे राहिलेले पैसे द्या मी लगेच सही करतो, आणि तुम्हाला जर व्यवहार पुर्ण करायचा नसेल तर मी तुम्हाला तुमचे पाच लाख रूपये परत देतो, तुम्ही माझा बैल मला परत द्या. गौतम यांनी त्यांचा भाऊ गौरव काकडे यांनाही बोलावून घेतले. त्यावेळी गौरव यांच्यासह आणखी तीनजणही तिथे आले. बोलण्याबोलण्यात त्यांच्यातील वाद विकोपाला गेला. अशातच गौरवने त्याच्याकडे असलेल्या पिस्तुलातून रणजित यांच्यावर गोळी झाडली.
         रणजित निंबाळकर जागीच खाली कोसळले. या प्रकारानंतर रणजित यांच्या पत्नीने त्यांना उपचारासाठी पुण्यात रुबी हॉस्पिटल येथे दाखल केले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

      या प्रकरणात वडगांव निंबाळकर पोलिसांनी शहाजीराव काकडे, गौरव काकडे यांना अटक केली आहे. फरार असलेले गौतम काकडे आणि त्यांच्या साथीदाराचा शोध सुरू आहे.

अंत्यविधी प्रसंगी सर्व क्षेत्रातील मान्यवर, बैलगाडा संघटना तसेच रणजीत निंबाळकर सरांवर प्रेम करणारी ग्रामस्थ व मित्र मंडळ उपस्थित होते.
 
सर्जा बैलाने घेतले पार्थिवाचे अंत्यदर्शन 
      रात्री सुमारे 8.30 च्या दरम्यान रणजीत निंबाळकर यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आले यावेळी सरांचा लाडका बैल हिंदकेसरी सर्जा पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article