-->
गौतम काकडे, सचिन मोरे, अजित मोडकट्टे यांना 4 दिवस पोलीस कोठडी तर गौरव काकडे व शहाजी काकडे यांना 2 दिवस पोलीस कोठडी

गौतम काकडे, सचिन मोरे, अजित मोडकट्टे यांना 4 दिवस पोलीस कोठडी तर गौरव काकडे व शहाजी काकडे यांना 2 दिवस पोलीस कोठडी

बारामती :- रणजीत निंबाळकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी गौतम काकडे याला पोलिसांनी अटक केली असून आज बारामती न्यायालयात हजर करण्यात आले. 

       अजित मोडकट्टे व सचिन मोरे यांनाही पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. या आरोपींनी सीसीटिव्ही फुटेज नष्ट केले असून रणजीत निंबाळकर यांचे सांडलेले रक्तही पुसले असून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेले पिस्तूल ही गायब असून तेही अजून पोलिसांकडे जमा करण्यात आले नाही व भांडणात वापरण्यात आलेली काठीही गायब असून तपास करण्यासाठी पोलिसांनी 10 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी म्हणून सरकारी वकिलामार्फत आज मुदत मागितली होती.
          बारामती न्यायालयाने गौरव काकडे आणि शहाजी काकडे यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
       गौतम काकडे व इतर आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
      पोलीस तपासात आत्तापर्यंत 7 आरोपी निष्पन्न झाले असून यामधील 6 आरोपीना पोलिसांनी अटक केले असून काकडे यांचे दिवाणजी हे अजूनही फरार आहेत.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article