-->
शिस्त हृदयात बाळगा, कृतीत आणा व सदैव तत्पर रहा संदेश देत, बारामतीत कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

शिस्त हृदयात बाळगा, कृतीत आणा व सदैव तत्पर रहा संदेश देत, बारामतीत कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

शिस्त हृदयात बाळगा, कृतीत आणा व सदैव तत्पर रहा
दि.२६ जुलै कारगिल विजय दिवस - रौप्य महोत्सवी वर्ष

बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या इंग्रजी माध्यम विद्यालय, विद्यानगरी येथे प्रशाला व जयहिंद फाउंडेशन, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने  कारगिल विजय दिवस साजरा केला.

विद्या प्रतिष्ठान संस्थेचे रजिस्ट्रार कर्नल श्रिश कंबोज, प्राचार्या सौ.राधा कोरे ,कॅप्टन रविंद्र लडकत यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. प्रशालेचा N.C.C. विभाग प्रमुख श्री.तुषार टांकसाळे , आॅफिसर सौ.प्रांजल खटके  व जयहिंद फाउंडेशन सदस्य श्री. अशोक घोडके यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

प्रशालेतील एनसीसी युनिट च्या विद्यार्थ्यांना  कर्नल श्री. श्रीश कंबोज,  प्राचार्य सौ.राधा कंबोज, जयहिंद फाउंडेशन, बारामतीचे अध्यक्ष श्री राजेंद्र जगताप यांनी  मार्गदर्शन केले. सैनिकी  जीवन, त्यांचा त्याग, बलिदान,  त्यांच्या कुटुंबियांचे  जीवन याविषयी माहिती दिली. त्यांच्या त्यागाची जाणिव ठेऊन आपण त्यांना सन्मान देणे आपले कर्तव्य असल्याचे सांगितले. जयहिंद फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची माहिती सांगून आपण सर्वांनी देशसेवा म्हणून आपापली कर्तव्ये मनापासून करण्याविषयी मार्गदर्शन केले.

या प्रसंगी जयहिंद फाउंडेशन बारामतीचे उपाध्यक्ष श्री.सतीश झगडे, सचिव श्री. सचिन कुंभार, सदस्य श्री.अशोक घोडके, श्री. दादा माळवे, श्री. रणजित जगदाळे व प्रा. श्री. सचिन तावरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनींनी केले. सौ. प्रांजल खटके यांनी आभार मानले.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article