-->
कोऱ्हाळे बु येथे पार पडलेल्या १४ व 19 वयोगटाच्या खो-खो स्पर्धेत सिध्देश्वर विद्यालयाने पटकावला प्रथम क्रमांक

कोऱ्हाळे बु येथे पार पडलेल्या १४ व 19 वयोगटाच्या खो-खो स्पर्धेत सिध्देश्वर विद्यालयाने पटकावला प्रथम क्रमांक

बारामती - आज दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी श्री सिद्धेश्वर पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये 14 व 19 वयोगटाच्या खो-खो स्पर्धा पार पडल्या. उद्घाटन समारंभासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी, पुणे मा.महेश चावले साहेब, बारामती तालुका क्रीडा संघ अधिकारी राजेंद्र खोमणे, क्रीडा शिक्षक देवकर सर, मेटकरी सर, सिद्धेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष  राहुल भगत, श्री सिद्धेश्वर पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज अध्यक्ष दत्तात्रय माळशिकारे सर, सचिव प्रा.महेश तांबे सर, प्राचार्य जालिंदर भोसले सर, व्यवस्थापक अमोल साळुंखे सर उपस्थित होते.
                  त्यामध्ये प्रथम क्रमांक श्री सिद्धेश्वर पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज या संघाचा आला तसेच द्वितीय क्रमांक वस्तीग्रह विद्यालय काराठी तसेच तृतीय क्रमांक म.ए.सो. कै गजाननराव भीमराव देशपांडे माध्यमिक विद्यालय बारामती ज्यांनी पटकावला  तसेच  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक मयूर जराड सर, गुरुराज खोमणे सर, रणजीत साळुंखे सर यांचे अभिनंदन करण्यात आले.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article