-->
कोऱ्हाळे येथील प्रसिध्द शिवशक्ति तरूण मंडळाच्या वतीने प्रवचन उत्साहात पार; अजूनही काही मंडळे पारंपरिक व सांप्रदायिक पद्धतीला महत्त्व देत आहेत - नितीन काशीद

कोऱ्हाळे येथील प्रसिध्द शिवशक्ति तरूण मंडळाच्या वतीने प्रवचन उत्साहात पार; अजूनही काही मंडळे पारंपरिक व सांप्रदायिक पद्धतीला महत्त्व देत आहेत - नितीन काशीद

बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बू येथील प्रसिध्द शिवशक्ति तरूण मंडळाच्या वतीने काल आयोजित करण्यात आलेले प्रवचन उत्साहात पार पडले. प्रसिद्ध कीतर्नकार नितीन महाराज काशिद यांचे प्रवचनाचा कार्यकम भक्तिमय वातावरण मधे पार पड़ला. यासाठी गावातील अनेक महिला व गावकऱ्यांनी हजेरी लावली होती. 
         आता चालू काळ बदलला असून मंडळांना डिजेचा दणदणाट, ऑर्केस्ट्रा, तमाशा याचे वेड लागले असून अजूनही काही मंडळे पारंपरिक व सांप्रदायिक पद्धतीला महत्त्व देत असल्याने त्यांना प्रवाचानाची संधी दिल्याबद्दल त्यांनी मंडळाचे आभार मानले.
          या प्रसंगी उपस्थित महिलासाठी मंडळ च्या वतीने  3 लकी ड्रॉ काढण्यात आले. त्या भाग्यवान 3 महिलांना अक्षय भैय्या जगताप यांच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. 
    लकी ड्रॉ सोडत मधील महिला खालील प्रमाणे 
1)सौ शितल धुमाळ
2) सौ पल्लवी गायकवाड़
3) सौ सुतार ताई
       मंडळ च्या वतीने उपस्थितांचे आभार अक्षय भैय्या जगताप यांनी मानले. तसेच पुढच्या वर्षी या पेक्षा नवीन उपक्रम शिवशक्ती तरुण मंडळ च्या मार्फ़त पार पाडतील अशी माहिती मंडळ च्या वतीने देण्यात आली.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article