-->
सोमेश्वर कारखान्याने प्रशस्त मंगल कार्यालय बांधण्याची सभासदांची मागणी

सोमेश्वर कारखान्याने प्रशस्त मंगल कार्यालय बांधण्याची सभासदांची मागणी

सोमेश्वरनगर - सोमेश्वर परिसरातील चार-पाच तालुक्यातील जनतेच्या अडचणीचा अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे मंगल कार्यालय, अनेक वर्षांची ही सर्वच जनतेच्या हिताची मागणी सभासदांकडून होत आहे.   सोमेश्वर कारखान्याने माळेगांव कारखान्याच्या धर्तीवर आता एक प्रशस्त व  नाम मात्र शुल्क असलेले मंगल कार्यालय बांधण्याची गरज आहे.
         प्रत्येक सभेवेळी पावसाळी वातावरण ठरलेले आहे.व त्या दृष्टीने सभामंडपाचे नियोजन करावे लागते. व मंडपावाला दरवर्षी भरपूर पैसे त्यासाठी घेत असतो. त्यामुळे दरवर्षी तोही मंडपाचा खर्च वाचेल. व इतर कार्यक्रमासाठीही त्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होईल. 
      सोमेश्वरनगर विकसित होत असताना सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम असे विधायक उपक्रम राबविण्या करिता नाम मात्र शुक्ल असलेले एक प्रशस्त हॉल असणे आवश्यक आहे. परिसरातील शाळा-महाविद्यालये याला सर्वांना तो उपयोगी पडणार आहे. शहराच्या ठिकाणी सभागृह, नाट्यगृह उपलब्ध असतात. शासन असे तालुका स्तरावर आणि शहराच्या ठिकाणी नाट्यगृह उभारणी करण्यासाठी निधी उपलब्ध करून देते. ग्रामीण भागात गाव स्तरावर नाही. जर वरील कार्यक्रम आणि इतर संभारभ कामी एक चांगले बंदिस्त व्यासपीठ असलेले आणि इतर कार्यकामासाठी खुले असे सभागृह हवे असे अनेक दिवस वाटत आहे. कारण इतर ठिकाणी लाखात खर्च येत आहे. यांस चर्चा होऊन मंजूरी व्हावी अशी सभासद मागणी करत आहेत 

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article