-->
महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या अधिमंडळाची ६६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या अधिमंडळाची ६६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या अधिमंडळाची 66 वी वार्षिक सर्वसाधारण सभा महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी उपाध्यक्ष श्यामराव काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान  येथे संपन्न झाली.
या सभेमध्ये विषय पत्रिकेवरील विषय सर्व साधारण चर्चा करुन मंजूर करण्यात आले.
पणन महासंघ ही महाराष्ट्रातील खरेदी-विक्री व पणन संस्थांची शिखर संस्था असून राज्यातील 827 “अ” वर्ग सहकारी संस्था पणन महासंघाचे सभासद आहेत. संस्थेने आजवरच्या काळात शेती व शेतकरी आणि ग्राहक यांच्या विकासासाठी आणि हितसंरक्षणासाठी अभिमानास्पद कामगिरी केलेली आहे. पणन महासंघाने शासनाच्या विविध योजना यशस्वीपणे राबविल्या असून शासनाने पणन महासंघावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अहवाल सालामध्ये धान व भरडधान्य, कडधान्य व तेलबिया खरेदी, खत व पशुखाद्य विक्रीचे काम केलेले आहे. शेतीमालाला लाभप्रद व वाजवी भाव मिळावा यासाठी विविध भरडधान्य व तेलबिया / कडधान्ये यांची केंद्रशासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दराने राज्यात खरेदी केली आहे. नाफेड, महाराष्ट्र शासन व एफ.सी.आय. करीता पणनमहासंघामार्फत कडधान्य (तूर, उडीद, मूग, चणा) व तेलबिया (सोयाबीन) खरेदी झालेली आहे. आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत धानाची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली आहे, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे यांनी यावेळी दिली.
यावेळी महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम, व्यवस्थापकीय संचालक श्रीधर डुबे पाटील , सरव्यवस्थापक प्रभाकर सावंत, नितीन यादव, देविदास भोकरे यांच्यासह महासंघाचे संचालक मंडळ, पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article