-->
श्री विठ्ठल शैक्षणिक संकुलात गुणवंत विद्यार्थ्यांना ७०५०० रूपये शिष्यवृत्तीचे वाटप

श्री विठ्ठल शैक्षणिक संकुलात गुणवंत विद्यार्थ्यांना ७०५०० रूपये शिष्यवृत्तीचे वाटप

शाळा ही समाजाची प्रतिकृती असते. समाजात एकमेकांच्या सहकार्याने प्रगतीपथाच्या योजना सुरू असतात. त्याप्रमाणे श्री विठ्ठल विद्या प्रसारक मंडळ भिकोबानगर येथे स्वर्गीय ताराबाई हणमंतराव शेडगे शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे.पणदरे परिसरातील श्री विठ्ठल विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय व्हि .डी. अण्णा जगताप यांच्या सामाजिक शैक्षणिक कार्याने प्रेरित होऊन  मा. श्री हणमंतराव गोविंदराव शेडगे रा. कुरणेवाडी यांनी आपल्या स्वर्गीय पत्नीच्या स्मरणार्थ आपल्या परिसरातील गुणवंत,होतकरू मुला मुलींच्या शैक्षणिक विकासासाठी एक आर्थिक मदत म्हणून 11 लाख रुपयाची ठेव पावती करून त्यातून येणाऱ्या प्रतिवर्षी व्याजापोटीच्या रकमेतून स्वर्गीय सौ ताराबाई हणमंतराव शेडगे शिष्यवृत्ती योजना  श्री विठ्ठल विद्या प्रसारक मंडळ भिकोबा नगर संस्थे मध्ये  सुरू केली. या शिष्यवृत्तीतून प्रतिवर्षी 60% मुली व 40 % मुलांना प्रोत्साहन पर शिष्यवृत्ती स्वरूपात आर्थिक मदत देण्यात येते.सध्याच्या धावपळीच्या युगात श्री हणमंतराव शेडगे साहेबांनी आपण आणि आपले कुटुंब एवढाच माफक विचार न करता शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर एक सामाजिक बांधिलकी जोपासत गरीब होतकरू गुणवंत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी तहयात शिष्यवृत्ती योजना आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ सुरू करून एक सामाजिक आदर्श नवीन पिढीला घालून दिला आहे. या योजने अंतर्गत 49 गुणवंत विद्यार्थ्यांना एकरकमी  70500 रुपये शिष्यवृत्तीचे धनादेश वाटप करण्यात आले. यामध्ये विठ्ठल विद्या प्रसारक मंडळातील सर्व शाखांतील इ. 10 वी,12  वी बोर्ड परिक्षेमध्ये विशेष गुणवत्ता मिळविले विद्यार्थी तसेच इ.9वी व 11वी वर्गातील विशेष गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी, एन एम एम एस शिष्यवृत्ती प्राप्त  विद्यार्थ्यांचा समावेश होता. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष मा. श्री अरविंद दादा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा शिष्यवृत्ती वाटपाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास संस्था सचिव मा. श्री शिवाजीराव काका जगताप , माननीय श्री अरविंदराव शेडगे साहेब ,मा. श्री नितीन सिद्राम शेडगे साहेब वरिष्ठ अभियंता रस्ते बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन ,श्री युवराज आप्पा खलाटे, मानाजीनगर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री सुनील जोशी सर, प्राथमिक शिक्षक श्री काकासो काळभोर ,श्री विष्णुपंत जगताप, रामचंद्र मोरे, संपतराव मोटे परिसरातील ग्रामस्थ, माजी विद्यार्थी आणि शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्री नंदकुमार पवार सर यांनी केले तर सूत्रसंचालन श्री बंडगर सर व सौ पिंगळे मॅडम यांनी केले . श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालय कांबळेश्वर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री जाधव एस. एस यांनी आभार मानले.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article