-->
गणेश उत्सव सण भक्तीमय वातावरणात शांततेत पार पाडावा; कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कडक कायदेशीर कारवाई करणार - सचिन लोखंडे

गणेश उत्सव सण भक्तीमय वातावरणात शांततेत पार पाडावा; कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कडक कायदेशीर कारवाई करणार - सचिन लोखंडे

बारामती -  माळेगाव पोलीस स्टेशन कार्यक्षेत्र अंतर्गत साजरा होणारा आगामी श्री गणेश उत्सव सण हा भक्तीमय धार्मिक वातावरणात निर्विघ्नपणे शांततेत पार पडावा यासाठी माळेगाव पोलीस स्टेशन कडुन आयोजित केलेल्या पोलीस - जनता सुसंवाद उपक्रम अंतर्गत माळेगाव पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी म्हणुन नव्याने पदभार स्विकारलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सचिन लोखंडे यांनी पोलीस स्टेशन हद्दीतील माळेगाव बु।। नगरपंचायत शहर सह इतर सर्व गावचे हद्दीतील सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच बँड, बॅंजो, साऊंड व मंडप व्यवसायिक आणि पोलीस पाटील यांची काल दि. 04/09/2024 रोजी सायं 07.05 वा ते रात्रौ 08.10 वा. चे दरम्यान संयुक्त बैठक घेवुन उपस्थितांशी संवाद साधुन त्यांना श्री गणेश उत्सव कालावधीत येणारे अडीअडचणी जाणुन घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपस्थित असलेले श्री. बालाजी लोंढे, मुख्याधिकारी, माळेगाव बु।। नगरपंचायत यांनी माळेगाव बु।। नगरपंचापत कार्यक्षेत्रातील सार्वजनिक श्री गणेश मंडळांचे पदाधिकारी यांना गणेश उत्सव नियमांत राहुन शांततेत पार पाडावा, असे आवाहन केलेले आहे.
              सदर बैठक दरम्यान स.पो.नि. श्री.सचिन लोखंडे यांनी सार्वजनिक ठिकाणी श्री गणेश मुर्ती स्थापना तसेच श्री मुर्ती स्थापना व विसर्जन मिरवणुक साठी पोलीस स्टेशन कडील रितसर परवानगी घेणे आवश्यक असुन त्यासाठी लागणारे कागदपत्रांची माहीती देवुन नगरपंचायत, ग्रामपंचायत कडील जागा वापराबाबत ना हरकत दाखला, सुरक्षित वीजपुरवठा करीता महावितरण कडुन तात्पुरते स्वरुपात वीज कनेक्शन घेणे किंवा जवळील अधिकृत वीज मीटर मधुन वीजेचा वापर करणेसाठी संबंधित वीज मीटर मालकाचे संमतीपत्र इ. कागदपत्रे यांची पुर्तता केलेनंतर माळेगाव पोलीस स्टेशन येथे श्री गणेश मंडळ पदाधिकारी यांनी लेखी अर्ज जमा करावेत तसेच संपुर्ण गणेश उत्सव कालावधीत खालील नियमांचे पालन  कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातुन सुचना दिलेल्या आहेत. सार्वजनिक श्री गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी इतर धर्माचे धार्मिक स्थळांसमोर मंडळाची श्री गणेश मुर्ती स्थापना करु नये, श्री गणेश मुर्ती मंडप तसेच त्या अनुशंगाने आयोजित कार्यक्रम ठिकाणी देखावे, फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स, तसेच कमानी लावत असताना त्यामुळे नागरीकांचे रहदारीस व वाहतुकीस अडथळा होईल असे लावु नयेेत. तसेच श्री. गणेश मंडप ठिकाणी तसेच श्री स्थापना व विसर्जन मिरवणुक दरम्यान सजावट करीत असताना कोणत्याही परिस्थितीत आक्षेपार्ह देखावे/शुभेच्छा फलक/धार्मिक भावना दुखविणारे चित्रफिती इ. बाबींचा वापर करु नये, श्री. गणेश स्थापना व विसर्जन मिरवणुक दरम्यान आक्षेपार्ह घोषणाबाजी/गाणे वाजविणे/अशिल्ल नृत्य करणे इ. प्रकार होणार नाहीत, श्री गणेश उत्सव अनुशंगाने कोणीही मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी नागरीक, व्यवसायिक यांचेकडुन जबरदस्तीने वर्गणी गोळा करु नये, श्री गणेश स्थापना व विसर्जन मिरवणुक परवानगी मिळणेसाठी पोलीस स्टेशनला दिलेल्या अर्जात नमुद मिरवणुक मार्गात ऐनवेळी बदल करुन नवीन मार्गावरुन मिरवणुक काढु नये, इतर धर्मियांचे धार्मिक स्थळांसमोर तसेच संमिश्र लोकवस्ती असलेल्या क्षेत्रात श्री गणेश मंडळाची मिरवणुक रेंगाळत ठेवु नये तसेच सदर ठिकाणी गुलाल उधळु नये, आक्षेपार्ह गाणी वाजवु नयेत, किंवा घोषणा देवु नयेत, श्री गणेश उत्सव अनुशंगाने श्री गणेश मुर्तीचे समाजकंटकापासुन तसेच जनावरांचे हल्ल्यांपासुन संरक्षण करणेसाठी तसेच लावणेत येणारे सर्व फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स इ.वरील कार्यकर्ते तसेच देवदेवतांचे फोटो यांचे समाजकंटकाकडुन विटंबना होवु नये म्हणुन त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही श्री गणेश मंडळ पदाधिकारी व कार्यकर्ते यांची आहे, म्हणुन श्री गणेश मंडळ पदाधिकारी यांनी स्वयंसेवकांची 24 तास करीता नेमणूक करावी, श्री.गणेश उत्सव कालावधीत सर्व धार्मिक विधी परंपरागत पावित्र्य राखुन करावेत,  श्री.गणेश उत्सव कालावधीत आरोग्य विषयक माहीतीपर उपक्रम, रक्तदान शिबिर, शालेय विदयार्थ्यांना शालेय साहीत्य वाटप, तसेच महापुरूष व थोर समाजसुधारक यांचे जीवन चरित्र वर आधारीत प्रोत्साहनपर व्याख्याने आयोजित करणेस प्राधान्य देण्यात यावे, श्री मुर्तींचे विसर्जन नगरपंचायत किंवा ग्रामपंचायतकडून नियोजन केलेल्या ठिकाणीच विसर्जन करावे. इतरत्र विसर्जन करू नये. सवादय मिरवणुक मध्ये मोठया आवाजाच्या असेंबल्ड, डॉल्बी मल्टीसाऊंड सिस्टीमचा वापर करु नये. तसेच ध्वनीक्षेपकाचा वापर करीत असताना रुग्णालय, शैक्षणिक संस्था, न्यायालय इ. शांतता झोन पासुन सभोवतालचे कमीत कमी 100 मीटर क्षेत्रात ध्वनीक्षेपकाचे आवाजामुळे त्रास होणार नाही तसेच मा.सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे तसेच ध्वनीप्रदुषण (विनियमन व नियंत्रण) अधिनियम- 2000 मध्ये नमुद झोन निहाय ध्वनीक्षेपक/वादयाचे आवाज मर्यादेचे उल्लंघन करु नये. ध्वनीप्रदुषण ( विनियमन व नियंत्रण) अधिनियम- 2000 व सुधारीत नियम 2017 मध्ये नमूद केलेल्या झोनमध्ये मर्यादित केलेल्या मानांकन (डेसिबल) पेक्षा जास्त आवाज ठेवणे पर्यावरण संरक्षण कायदा 1986 चे कलम 15 (1) प्रमाणे गुन्हा असून उल्लंघन करणारे व्यक्ती हे 5 वर्षे कैदेचे शिक्षेस किंवा 1,00,000/- दंड किंवा दोन्ही शिक्षेस पात्र आहेत, श्री गणेश उत्सव कार्यक्रम हा धार्मिक स्वरुपाचा असलेने त्या अनुशंगाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करावयाचे असलेस त्यामध्ये अष्लिल/विभत्स स्वरुपाचे वर्तन करणारे नृत्यांगणा/कलाकार यांना सहभागी करुन घेवु नये. तसेच नागरीकांची गर्दी मारामारी, चेंगरा- चेंगरी होऊ नये, तसेच महीलांची छेडछाड होणार नाही, या करीता सुरक्षित ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करुन गर्दीचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करावे. श्री गणेश मंडप व परीसरात तसेच आयोजित विविध कार्यक्रम ठिकाणी सर्व नागरीक, कलाकार यांचे सुरक्षेचे दृष्टीने पुरेशी प्रकाश व्यवस्था ठेवावी, सुरक्षेचे दृष्टीकोनातुन श्री गणेश मंडप व परीसर तसेच आयोजित कार्यक्रमाचे ठिकाणी चांगले प्रतीचे नाईट व्हीजन सी.सी.टि.व्ही कॅमेरे बसवावेत तसेच संपुर्ण कार्यक्रमाचे व्हिडीओ शूटिंग करुन त्याची एक सी.डी तात्काळ माळेगाव पोलीस स्टेशन गोपनीय विभाग येथे सादर करावी, श्री गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट इ. सारख्या सोशल मिडीया मध्ये आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ, रिल्स प्रसारीत  करु नयेत., असे वरील प्रमाणे सर्व शासकीय आदेश, सुचना, नियम व अटींची माहीती उपस्थितांना देवुन त्याचे तंतोतंत पालन करणेचे बंधन हे सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, हितचिंतक अथवा नागरीक यांचेवर असलेबाबत नमुद केलेले आहे, तसेच कोणत्याही नागरीकांना काही चुकीच्या गोष्टी निदर्शनास आलेस तात्काळ माळेगाव पोलीस स्टेशन येथे संपर्क करणेचे आवाहन केलेेले आहे. तसेच सदर बैठक कार्यक्रम दरम्यान स.पो.नि. श्री. संतोष लोखंडे यांनी मा. जिल्हाधिकारी सो. पुणे यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातुन आगामी श्री गणेश उत्सव सणाचे पार्श्वभुमीवर पुणे ग्रामीण जिल्हयात त्यांचे कार्यालय कडील जा.क्र-पगक/कावि/3683/2024 दि. 26/08/2024 अन्वये संपुर्ण पुणे ग्रामीण जिल्हयात दि. 26/08/2024 रोजीचे 00.05 वा. पासुन ते दि. 07/09/2024 रोजीचे 24.00 वा.चे पर्यंत या कालावधीत महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 37 (1) व (3) चा जारी केलेल्या अंमलानुसार संपुर्ण पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांना पुढील प्रमाणे सर्व कृती करणेस मनाई करणेत आलेली आहे, महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 37 चे पोटकलम (3) अन्वये पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करणे, तसेच मा.पोलीस अधीक्षक सोा. पुणे ग्रामीण यांचे पुर्वपरवानगी शिवाय सभा घेणे किंवा मिरवणुका काढणेस मनाई केलेली आहे, कोणताही दाहक पदार्थ अथवा स्पोटक पदार्थ द्रव्य बरोबर नेणे., दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे., शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठया, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल, अशी कोणतेही वस्तु जवळ बाळगणे., कोणत्याही इसमाचे चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे, किंवा पुढाऱ्यांचे चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.    
                     मोठयाने अर्वाच्य घोषणा देणे किंवा वाद्य वाजविणे. ज्या योगेे सभ्यता अगर नितिमत्ता यांस धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल, किंवा राज्य उलथवुन देण्यास प्रवृत्त करेल अषी आवेशपुर्ण भाषणे करणे किंवा अविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करुन त्याचा जनतेत प्रसार करणे. इ. कृतीस मनाई केलेली असलेबाबत माहीती दिलेली आहे तसेच त्यानंतर सदर कालावधी करीताच मा.पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी वरील कालावधीत पुणे ग्रामीण पोलीस दलातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, व सर्व बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी यांना रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे त्यांनी वर्तणूक किंवा वागणूक कशी ठेवावी या विषयी निर्देश देणे तसेच अशा कोणत्याही मिरवणुका या कोणत्याही मार्गाने, कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व अशी वेळ निश्चिंत करणे, तसेच सर्व मिरवणुकीच्या व जमावांच्या प्रसंगी व उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्याहुन किंवा सार्वजनिक जागी किंवा स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा न होऊ देणे यासाठी संबंधित आयोजक, नागरीकांना योग्य ते आदेश देणे.सर्व रस्त्यावर व रस्त्यामध्ये घाट किंवा घाटावर सर्व धक्क्यावर व धक्क्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानांच्या कपडे धुण्याच्या व उतरणेच्या जागांच्या ठिकाणी व देवालय आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणेसाठी योग्य ते आदेश देणे, कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ ढोल, ताशे व इतर वादये वाजविणे व गाणी गाण्याचे, शिंगे व इतर कर्कश वादये वाजविणेचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणेसाठी योग्य ते आदेश देणे, कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी लोकांना उपद्रव होऊ नये म्हणुन ध्वनीक्षेपकाचा (लाऊड स्पीकर) उपयोग करणेचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणेसाठी योग्य ते आदेश देणे. 
           यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये अधिकार प्रदान करण्याचा आदेश जारी केलेला असुन सदर आदेषाचा वापर ते श्री गणेश उत्सव कालावधीत करणार असले बाबत माळेगाव पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी श्री.सचिन लोखंडे यांनी सांगितलेले आहे. तसेच वरील सर्व नियम व अटींचे तसेच पोलीसांनी ऐनवेळी सदर ठिकाणची परिस्थिती पाहुन दिलेल्या सुचनांचे श्री गणेश मंडळ पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पालन करणेत अपेक्षित असुन पोलीसांनी सुचना देवुनही श्री गणेश मंडळ पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी त्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केलेने कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्याची भुमिका व्यक्त केलेली आहे.
                 सदर कार्यक्रम दरम्यान स.पो.नि.सचिन लोखंडे, श्री. बालाजी लोंढे, मुख्याधिकारी, माळेगाव बु।। नगरपंचायत यांचेसह श्री.योगेश भोसले तालुकाध्यक्ष, बारामती तालुका मराठी पत्रकार यांनी आपली मनोगते व्यक्त केलेले असुन या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस नाईक श्री.ज्ञानेश्वर सानप, गोपनीय विभाग, माळेगाव पोलीस स्टेशन यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्री ओम भुतकर, प्रशासकीय अधिकारी, माळेगाव बु।। नगरपंचायत यांनी मानलेले आहेत.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article