-->
मु.सा काकडे महाविद्यालयातील आर्यवीर पाटीलची जलतरण स्पर्धेत चमकदार कामगिरी

मु.सा काकडे महाविद्यालयातील आर्यवीर पाटीलची जलतरण स्पर्धेत चमकदार कामगिरी

सोमेश्वरनगर- महाराष्ट्र राज्य युवक व सेवा संचालनालय पुणे अंतर्गत पुणे जिल्हा क्रीडा परिषद व पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या  जिल्हास्तरीय शालेय जलतरण (ब्रेस्टस्ट्रोक ५०मीटर, १००मीटर, २००मीटर) स्पर्धेत आपल्या कनिष्ठ महाविद्यालयातील  आर्यवीर अश्विनकुमार पाटील(इयत्ता ११वी वाणिज्य, १७ वर्षे वयोगट) प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी  निवड झाली.
           यशस्वी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष मा.सतीश भैय्या काकडे- देशमुख, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक अभिजीत भैय्या काकडे- देशमुख, ,महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ.देविदास वायदंडे, संस्थेचे सचिव सतीश लकडे, महाविद्यालय व्यवस्थापन समिती सदस्य प्रा.सुजाता भोईटे,उपप्राचार्य प्रा.जयश्री सणस, पर्यवेक्षक गोलांदे आर.बी यांनी अभिनंदन केले. 
  
      यशस्वी खेळाडू विद्यार्थ्याला प्रा. डॉ.बाळासाहेब मरगजे, प्रा दत्तराज जगताप, सुप्रिया पाटील यांनी मार्गदर्शन केले.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article