-->
मु. सा  काकडे महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

मु. सा काकडे महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

  सोमेश्वरनगर- येथील मु.सा. काकडे महाविद्यालयामध्ये   दिनांक ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला.                                              
                या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे दैनिक सकाळचे पत्रकार श्री. संतोष शेंडकर होते, तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे होते.   
              यावेळी व्यवस्थापन समिती सदस्या सौ. सुजाता भोईटे, उपप्राचार्या श्रीमती जयश्री सणस, पर्यवेक्षक राहुल गोलांदे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.                                               
    याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी शिक्षक यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.                          
        यावेळी प्रमुख पाहुणे दैनिक सकाळचे पत्रकार श्री. संतोष शेंडकर यांनी प्रथम सर्व शिक्षकांना  शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देऊन शिक्षक हा ज्ञान देत असताना कोणताही दुजाभाव करीत नाही, तर सर्वांना सारखेच ज्ञान देण्याचा प्रयत्न करत असतो, तसेच आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये प्राचीन काळापासून ते आत्तापर्यंत कसे बदल होत गेले याचे वास्तव याविषयी विचार मांडले. तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीच खऱ्या अर्थाने शिक्षणाची बीजे रुजवली आहे. तसेच रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांच्या आजी आजोबांना शिक्षणाची संधी खेड्यापाड्यापर्यंत उपलब्ध करून दिली. सोमेश्वर परिसरामध्ये माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणाच्या संधी  ह्या मुगुटराव काकडे यांच्यामुळे  निर्माण झाल्या, तसेच विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न पडले पाहिजेत व त्या प्रश्नांचे निरसन करणे हेच खरे शिक्षण आहे आणि शेवटी शिक्षकांनी संविधानिक विद्यार्थी घडवावा अशी अपेक्षा व्यक्त केली.              
                                                                                                कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देऊन, ऋषीमुनी पासूनचे  आजचे शिक्षण  यामध्ये कसा बदल होत गेला व नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षकांनी सुद्धा आपल्या अध्यापनामध्ये बदल केला पाहिजे.तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणाची गंगा ही खऱ्या अर्थाने भारतामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रयत्नांनी मिळाली तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या रूपाने सर्वांपर्यंत  शिक्षण मिळवून दिले,असे विचार मांडले.          
                         या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. अनुराधा जगताप  या विद्यार्थिनीने केले, तर शिक्षक मनोगतामध्ये प्रा. राहुल खराडे, प्रा. सौ. मृणालिनी मोहिते यांनी आपले विचार व्यक्त केले. तर सूत्रसंचालन कु. सृष्टी गडदरे या विद्यार्थिनींनी केले. तर आभार कु. हर्षदा लांडगे या विद्यार्थिनीने मानले. कार्यक्रमाच्या  समन्वयक सौ. अर्चना पवार  व सौ. कल्पना कदम  या होत्या.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article