-->
गणेश पतसंस्थेत तब्बल १ कोटी २२ लाख रुपयांचा अपहार; संस्थेचे सचिव सतीश काकडे व लेखनिक निलेश कुलकर्णी यांच्यावर वडगांव निंबाळकर पोलिसांत गुन्हा दाखल

गणेश पतसंस्थेत तब्बल १ कोटी २२ लाख रुपयांचा अपहार; संस्थेचे सचिव सतीश काकडे व लेखनिक निलेश कुलकर्णी यांच्यावर वडगांव निंबाळकर पोलिसांत गुन्हा दाखल

सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील निंबुत येथील श्री गणेश ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत तब्बल १ कोटी २२ लाख २९ हजार ८०५ रुपयांच्या अपहार प्रकरणी संस्थेचे सचिव व लेखनिक यांच्यावर वडगाव निंबाळकर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
           याबाबत लेखापरीक्षक किरण ज्ञानदेव मोरे, रा. पारगाव (सालू-मालू) ता. दौंड जि. पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संस्था सचिव सतिश वसंतराव काकडे रा निरा, वार्ड क्र. 02, निरा, तालुका पुरंदर, जि. पुणे. व लेखनिक निलेश नरहरी कुलकर्णी, रा निरा, वार्ड क्र. 3, महात्मा गांधी विद्यालया शेजारील बिल्डींग, निरा, ता. पुरंदर, जि.पुणे, यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
          पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निंबुत श्री गणेश ग्रामीण बिगर शेती सहकारी पथसंस्था निंबुत ता बारामती या संस्थेत दि. दि.01/04/2020 ते 31/03/2023 या कालावधीत संस्थेचे सचिव सतिश वसंतराव काकडे व लेखनिक निलेश नरहरी कुलकर्णी यांनी त्यांचे पदाचा दुरुपयोग करुन सदर पथसंस्थे मध्ये सभासदांची 1 कोटी 22 लाख 29 हजार 805-इतकी रक्कम जमा केली असताना सुद्धा ती रक्कम सचिव व लेखनिक यांनी त्यांच्या संस्थेची बँक, बँक ऑफ महाराष्ट्र तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा निरा येथे सदर रक्कमेचा बँकेत भरणा न करता दप्तरी दिशा भुल करणारे खोटे व बनावट व्यवहार नोंदी जानीवपुर्वक करुन खोटे जमा खर्च नोंदवुन संस्था व नमुद संस्था सभासद त्यांची फसवनुक व विश्वास घात करुन संस्थेचे १ कोटी २२ लाख २९ हजार ८०५ रुपये रक्कमेचा स्वतःच्या फायद्यासाठी गैरव्यवहार करुन अपहार केला आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article