-->
थालसिमिया अनुवांशिक आजार - डॉ. नीता मुन्शी

थालसिमिया अनुवांशिक आजार - डॉ. नीता मुन्शी

थालसिमिया हा आजार आई वडिलांकडून आपल्या मुलांना अनुवांशिक देणगी म्हणून दिला जातो. थालसिमियामुळे बालपणापासूनच अनेकांचे जगणे अतिशय कठीण होऊन जाते त्यामुळे विवाहपूर्व तपासणी करणे हाच यावर उपाय असल्याचे प्रतिपादन भारतीय थालसेमीया सोसायटीच्या पुणे विभागाच्या प्रमुख डॉ. नीता मुन्शी यांनी केले. 
रोटरी क्लब ऑफ बारामती आणि शिवनगर विद्या प्रसारक मंडळ यांनी संयुक्तपणे आयोजित थालसिमिया  जागृती कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.यावेळी व्यासपीठावर रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 च्या मॅटर्नल अँड चाईल्ड हेल्थ च्या को डायरेक्टर झिम्रा इसराल,रोटरी क्लब ऑफ बारामतीचे अध्यक्ष अरविंद गरगटे, सचिव रविकिरण खारतोडे,सोशल प्रोजेक्ट (मेडिकल) चे डायरेक्टर अभिजित बर्गे, शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.धनंजय ठोंबरे,प्राचार्य डॉ. शैलेंद्र मुकणे, प्रभारी प्राचार्य डॉ. अजित चांदगुडे, डॉ. नीता दोशी, मॅटर्नल अँड चाईल्ड हेल्थ च्या झोनल चेअरमन दर्शना गुजर आदी मान्यवर  उपस्थित होते.
डॉ. नीता मुन्शी पुढे म्हणाल्या की या आजाराचे निदान वेळेवर झाले नाही तर पुढील काळात या बालकांना बोनमॅरो सारख्या खर्चिक उपचारांचा आधार घ्यावा लागतो मात्र असे उपचार केल्यानंतरही आपल्याला खात्री देता येत नाही. यासाठी विवाहपूर्व रक्त तपासणी केल्यास मायनर थालसिमिया असलेल्या मुलांनी एकमेकांशी विवाह करू नये अशा जोडप्यांना होणाऱ्या अपत्यांमध्ये थालसिमिया हा आजार होण्याची शक्यता अधिक असते.विवाहपूर्व तपासणी करून असे विवाह होणार नाहीत याची काळजी घेणे हाच यावर उपाय असल्याचे मत डॉ. मुन्शी यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ बारामतीचे अध्यक्ष अरविंद गरगटे, शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे डॉ.धनंजय ठोंबरे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी शिवनगर मध्ये शिक्षण घेणाऱ्या सुमारे शंभर मुलांची थाल सिमियाची रक्त तपासणी करण्यात आली.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article