-->
रोटरीचा "आशा - एक किरण" उपक्रम आशादायी

रोटरीचा "आशा - एक किरण" उपक्रम आशादायी

रोटरी डिस्ट्रिक्ट 3131च्या मॅटर्नल अँड चाईल्ड हेल्थ समिती,रोटरी क्लब ऑफ बारामती आणि मेहता हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती तालुक्यातील आशा सेविकांसाठी " आशा सेविकांचे सशक्तीकरण आणि प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गासाठी आणि कार्यशाळेसाठी भारती हॉस्पिटलच्या डॉ. अर्चना शिंगवी, मॅटर्नल अँड चाईल्ड हेल्थ च्या रोटरी डिस्ट्रिक्ट 3131च्या डायरेक्टर शोभा नहार, रोटरी क्लब ऑफ बारामतीचे अध्यक्ष अरविंद गरगटे, सचिव रविकिरण खारतोडे, हेल्थ डायरेक्टर अभिजित बर्गे,झोनल डायरेक्टर दर्शना गुजर,एंवायर्नमेंट डायरेक्टर वसंतराव माळुंजकर, बारामतीचे आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे आणि डॉ सुषमा कदम आदी मान्यवर उपस्थित होते
या कार्यशाळेत भारती हॉस्पिटल येथील डॉ.नंदिनी माळशे आणि डॉ अमृता वाळींबे यांनी नवजात बालकांचे संगोपन कसे करावे यावर मार्गदर्शन केले. नीना रायसोनी यांनी महिलांनी मासिक पाळीच्या काळात घ्यावयाची काळजी आणि वापराण्यासाठीच्या कपड्याची निवड यावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ.राजेंद्र बडगुजर,वसंतराव माळुंजकर, यांनी उपस्थित आशा सेविकांना मार्गदशन केले. या वेळी कार्यशाळेसाठी उपस्थित असणाऱ्या सुमारे चारशे आशा सेविकांना रियूजेबल पॅडचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशासाठी रोटरी क्लब ऑफ बारामतीच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article