-->
कृषि विज्ञान केंद्रामार्फत 16 ते 20 जानेवारी रोजी भारतातील सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शनाचे आयोजन

कृषि विज्ञान केंद्रामार्फत 16 ते 20 जानेवारी रोजी भारतातील सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शनाचे आयोजन

कृषि विज्ञान केंद्रामार्फत 16 ते 20 जानेवारी रोजी भारतातील सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शनाचे आयोजन
 
अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित कृषी विज्ञान केंद्रामार्फत शारदानगर (ता. बारामती) येथे 'कृषिक-२०२५' हे जागतिक स्तरावरील कृषी प्रदर्शन आयोजित केले आहे.
       बुधवारी (ता. १५) या प्रदर्शनाचे उद्‌घाटन होणार असून, गुरुवार (ता. १६) ते सोमवार (ता. २० जानेवारी) या कालावधीत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार असल्याची माहिती अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी दिली.

             ज्येष्ठ नेते व ट्रस्टचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे, क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे उपस्थित राहणार  आहेत. 

           पवार म्हणाले, ''कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर ऊस पिकात अधिक प्रभावीपणे करणे व त्या अनुषंगाने कमी खर्चात अधिक उत्पन्न घेण्याची प्रक्रिया माहिती करून घेण्यासाठी यंदाचे कृषिक प्रदर्शन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातून शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठ, मायक्रोसॉफ्ट कंपनी, अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट आदी संस्था एकत्र आलेल्या आहेत. आमचे संशोधन, तंत्र व संकल्पना प्रत्यक्षात कसे कार्य करतात, हे या कृषी प्रदर्शनात सर्वांना बघण्यास मिळणार आहे. कृषिक प्रदर्शनातून बहुसंख्य शेतकरी, शास्त्रज्ञ, अधिकारी आणि उद्योजकांना कृषी क्रांतीची नवीन दिशा मिळणार आहे. यावेळी ट्रस्टचे सीईओ नीलेश नलावडे उपस्थित होते. 

         कृषिक प्रदर्शनात यंदाचे मुख्य आकर्षण
देशात पहिल्या फार्म ऑफ द फ्युचरची उभारणी, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे वाढवलेला ऊस, नावीन्यपूर्ण फळझाडांची लागवड, परदेशी कटफ्लॉवरची प्रात्यक्षिके, शेवंतीच्या २९ प्रकारची फूलशेती, काळा टोमॅटोसह २९ प्रकारच्या टोमॅटोचे देशी वाण, काळी मिरची व मिरचीची विविध प्रात्यक्षिके, जिरायती शेतीसाठी ज्वारीचे विविध वाण व तुर्की बाजरी, कापसाची नवीन तंत्रज्ञानावर आधारित लागवड व काढणी प्रात्यक्षिके, स्वतंत्र पशुदालन, भरडधान्य पहावयास मिळणार आहे. 
         तसेच नेदरलॅंड, चीन, अमेरिका, इस्राईल, ब्राझिल, स्पेन, इटली, आफ्रिका, फ्रान्स, थायलंड, कोरिया, जपान, इंग्लंड, ऑस्टेलिया आदी देशांतील विविध एआय-सेन्सर व रोबोटिक तंत्रज्ञान पाहण्याची शेतकऱ्यांना प्रदर्शनात संधी मिळणार आहे.

.       थेट प्रात्यक्षिकावर आधारीत कृषी प्रदर्शनाचे हे १० वे वर्ष आहे. दरवर्षी देशभरातून अडीच ते तीन लाख शेतकरी भेट देतात. तब्बल १७० एकर प्रक्षेत्रावर प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. राजेंद्र पवार हे १९८० च्या दशकात अमेरिकेतील मिशिगन स्टेटमध्ये कृषी पदवीचे शिक्षण घेत असताना मिनिसोटा कॉन्टीमध्ये त्यांनी अशा प्रकारचे प्रात्यक्षिक आधारित प्रदर्शन पाहिले होते.
           काळा टोमॅटोची प्रात्यक्षिके
        नाविन्यपूर्ण फळझाडांची लागवड, परदेशी कटफ्लॉवरची प्रात्यक्षिके, शेवंतीच्या २९ प्रकारची फुलशेती, खुल्या पद्धतीने अधिक दर्जेदार व उत्पादन देणारा टोमॅटो, काळा टोमॅटो व २९ प्रकारचे टोमॅटोचे देशी वाण, अधिक तिखट गुणधर्माची काळी मिरची, मिरचीची विविध प्रात्यक्षिके, जिरायत शेतीसाठी ज्वारीचे विविध वाण तुर्की बाजरी, चीया, टोमॅटो, कापसाची नवीन तंत्रज्ञानावर आधारित लागवड, काढणी प्रात्यक्षिके, स्वतंत्र पशुदालन, भरडधान्य, भोपळा, शेवगा, काकडी, कलिंगड, खरबुजाच्या विविध वाणांची प्रात्यक्षिके, मक्याची चायनीज तंत्राद्वारे होणारी लागवड, अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कमी खर्चातील शेळी पालन, कोंबडी पालन व मत्स्यपालनाचे तंत्रज्ञान कृषी प्रदर्शनात असणार आहे.

# जाहिरात 

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article