इंदापूर राधिकानगर येथील अंगणवाडीत ७६ वा प्रजासत्ताक दिना उत्साहात साजरी
Sunday, January 26, 2025
Edit
इंदापूर : दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी इंदापूर येथील अंगणवाडी क्रमांक ११८ राधिकानगर येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला.
यावेळी ॲड. विशाल राजेंद्र राऊत, ॲड. ओंकार गिरीश शहा व ॲड. सुमित अशोक वाघमारे हे प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमास लाभले.
ॲड. सुमित वाघमारे यांनी उपस्थित पालक वर्ग व बाल वर्गाला मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे नियोजन आयोजन अंगणवाडीच्या सेविका श्रीमती रुपाली दीपक शेलार व मदतनीस सौ. योजना अशोक वाघमारे यांनी केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मदतनीस सौ. योजना वाघमारे यांनी केले व सूत्रसंचालन आभार प्रदर्शन सेविका रुपाली शेलार यांनी केले.