-->
दि एम्रल्ड हाईट्स प्री स्कूल अँड ॲकॅडमीमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

दि एम्रल्ड हाईट्स प्री स्कूल अँड ॲकॅडमीमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

प्रतिनिधी - फलटण तालुक्यातील साखरवाडी मध्ये असणाऱ्या दि एम्रल्ड हाईट्स प्री स्कूल अँड अकॅडमी शाळेमध्ये सोमवार दि.27/01/2025 रोजी वार्षिक स्नेहसंमेलन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 
    
        या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन पीएसआय श्री पवार, श्री हांगे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, श्री पिसे , संस्थेचे चेअरमन दत्तात्रय शिंदे, उपाध्यक्ष नवनाथ शिंदे, डायरेक्टर अजिंक्य शिंदे उपस्थित होते. 
          या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी विविध वेशभूषेत तयार होऊन आले होते. सर्वप्रथम प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते सरस्वती पूजन व नटराज पूजन करण्यात आले .त्यानंतर पाहुण्यांचे सत्कार करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, पालकांना या काळात महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत त्याविषयी माहिती सांगितली, आपल्या मुलांचे भवितव्य आपणच घडवणार असा संदेश दिला. त्यानंतर मुलांनी आपले नृत्य सादर केले तसेच त्यासोबतच लाठीकाठी डेमो, अबॅकस डेमो विद्यार्थ्यांनी व पालकांनी या कार्यक्रमाचा भरभरून आनंद लुटला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर नेमाने यांनी केले. तसेच साऊंड अरेंजमेंट शशांक आरणीकर यांचे होते. हा सर्व कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झाला, तसेच यावेळी शाळेच्या इन्चार्ज मोनाली कुलकर्णी, शिवगंगा पवार, वर्षा खोमणे, पल्लवी भापकर, शिरीन मुलाणी, विद्या भिसे, तेजश्री सोनटक्के, रोहिणी ठोंबरे, अफसाना सय्यद, कोमल भगत, रूपाली बनकर, ऐश्वर्या कापरे, सुषमा गायकवाड, आशिष, अमर भंडलकर, शेखर मदने, खोमणे, आदरणीय पालक वृंद, विद्यार्थी उपस्थित होते.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article