-->
राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांना दिशा

राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांना दिशा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना, शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे कॉलेज ऑफ कॉमर्स सायन्स अँड कॉम्प्युटर एज्युकेशन माळेगाव (बु)यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष हिवाळी निवासी श्रमसंस्कार शिबिर 2024- 25  शुक्रवार दिनांक 03 जानेवारी 2025 ते 9 जानेवारी 2025 या कालावधीत मौजे थोपटेवाडी, तालुका -बारामती जिल्हा - पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन मा. श्री. प्रा. अच्युत शिंदे यांच्या हस्ते झाले. 
            या वेळी प्रमुख पाहुणे  म्हणून बोलताना माननीय श्री. शिंदे सर यांनी स्वयंसेवकांना व्यक्तिमत्व विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना कशी महत्त्वाची आहे या विषयावर मार्गदर्शन केले. सामाजिक कार्यातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकास घडते हे त्यांनी विविध उदाहरणातून मुलांना दाखवून दिले. तरुणांना योग्य वयामध्ये जर मार्गदर्शन मिळाले तर त्यांचे भविष्य सुंदर बनते असेही शिंदे सर म्हणाले.

         तसेच या वेळी ग्रामस्थ, कॉलेज प्राचार्य डॉ. अजित चांदगुडे, कार्यक्रम अधिकारी प्रा. आशिष भगत , महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. बेबीताई झारगड, प्रा. प्रशांत कदम, प्रा. शितल धुमाळ, प्रा. सचिन सस्ते, प्रा. सचिन तावरे, प्रा. किशोर सुतार  आणि सर्व सहकारी स्वयंसेवक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेवकांनी केले.

            शिबिर आयोजित करण्याकरिता शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष व माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माननीय श्री. केशवबापू जगताप तसेच संस्थेचे विश्वस्त मा.श्री वसंतराव तावरे, श्री रवींद्र थोरात, श्री.अनिल जगताप, श्री. महेंद्र तावरे, श्री रामदास आटोळे, श्री. गणपत देवकाते, सौ.सीमा जाधव, सौ.चैत्राली गावडे, संस्थेचे सचिव मा.डॉ.धनंजय ठोंबरे यांचे मार्गदर्शन लाभले.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article