-->
बारामती उप माहिती कार्यालयात पत्रकार दिन साजरा

बारामती उप माहिती कार्यालयात पत्रकार दिन साजरा

बारामती: बारामती उप माहिती कार्यालयात मराठी पत्रकार दिनाचा कार्यक्रम पत्रकारांच्या उपस्थितीत उत्साहात पार पाडला. दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या कार्यक्रमास तहसीलदार गणेश शिंदे उप माहिती कार्यालयातील कर्मचारी,पत्रकार स्वप्निल कांबळे, मन्सूर शेख,संतोष जाधव,अजिंक्य सातकर, सुनिल शिंदे, उमेश दुबे, दशरथ मांढरे, चेतन शिंदे, सुरज देवकाते, निलेश जाधव, संतोष सवाने, महेंद्र गोरे,संतोष शिंदे,संदीप साबळे, संतोष पांढरे,भारत तुपे,तैनुर शेख उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे आयोजन ऑल इंडिया संपादक संघ महाराष्ट्र राज्य, संपादक पत्रकार संघ बारामती, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ बारामती, प्रेस क्लब बारामती, व्हॉइस ऑफ मीडिया बारामती, वृत्तपत्र संपादक पत्रकार संघ बारामती,पत्रकार संघ बारामती,भारतीय पत्रकार संघ या सर्व संघटनांच्या वतीने करण्यात आले होते. 
 
यावेळी बारामती उपविभागीय अधिकारी श्री.नावडकर व तहसीलदार श्री.शिंदे यांनी पत्रकारांना गुलाब पुष्प देऊन सन्मान करून शुभेच्छा दिल्या.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article