-->
काकडे महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी शक्ती अभियान पथकाचे मार्गदर्शन

काकडे महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी शक्ती अभियान पथकाचे मार्गदर्शन

सोमेश्वरनगर - येथील मु.सा. काकडे महाविद्यालयात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय बारामती अंतर्गत शक्ती अभियान पथकाने कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अल्पवयीन मुलांकडून कळत नकळत होत असलेल्या गुन्ह्याविषयी सखोल मार्गदर्शन, या पथकातील सदस्या पोलीस कॉन्स्टेबल श्रीमती कदम मॅडम यांनी केले.  उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शना नुसार या पथकाचे काम सुरू आहे. विद्यार्थ्यांनी वाईट संगतीतून गुन्हा केला तर त्याचे होणारे परिणाम व त्यामुळे पालकांना होणारा मानसिक त्रास याबद्दल मार्गदर्शन केले.  कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आज युवकांची खूप मोठी जबाबदारी आहे याची सर्व विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली. जर एखादा गुन्हा केला तर आपल्याला कोणत्या कलमानुसार शिक्षा होईल व त्यातील तरतुदीं याविषयी सखोल माहिती दिली. कायद्यामध्ये झालेला बदल नेमका काय आहे हे सुद्धा त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले   पोक्सो कायदा व त्याच्या शिक्षेची तरतूद काय आहे हे सविस्तरपणे स्पष्ट केले. यावेळी या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण अभंग यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या संकल्पनेतून या शक्ती पथकाची स्थापना झालेली आहे, या पथकाचे कार्यक्षेत्र बारामती व इंदापूर या दोन तालुक्यां मध्येआहे. इयत्ता नववी ते बारावी या वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये वाईट संगती मधून गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता अधिक असते, म्हणून या वयोगटातील विद्यार्थ्यांनी अधिक काळजी घेऊन आपल्या पालकांच्या व शिक्षकांच्या सूचनांचे पालन केले पाहिजे असे सांगितले.
          याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी या पथकाचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या, यावेळी उपप्राचार्या श्रीमती जयश्री सणस. महिला पोलीस कॉन्स्टेबल श्रीमती दणाने,  सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व  बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा.राहुल गोलांदे यांनी केले तर आभार प्रा.राहुल खराडे यांनी मानले.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article