-->
अल्केमिस्ट स्पोकन इंग्लिश चा तेरावा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

अल्केमिस्ट स्पोकन इंग्लिश चा तेरावा वर्धापन दिन उत्साहात संपन्न


प्रतिनिधी, बारामती येथील अल्केमिस्ट स्पोकन इंग्लिश क्लासेस यांचा 13 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गेल्या वर्षभरातील वेगवेगळ्या उपक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.  या कार्यक्रमासाठी शेतकरी योद्धाचे संपादक योगेश नालंदे, महिला व बालकल्याण विभाग बारामती नगरपालिका सोनाली राठोड, योद्धा प्रोडक्शन चे नानासाहेब साळवे, माजी नगरसेवक सुरज शेठ सातव व एक्सलेन्स सायन्स अकॅडमीचे गौरव गुंदेचा सर उपस्थित होते.
   यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगते व्यक्त करत अकॅडमीच्या तेरा वर्षाच्या अथक परिश्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना गौरव गुंदेचा यांनी सांगितले की खऱ्या अर्थाने अल्केमिस्ट स्पोकन इंग्लिश क्लासेस हे विद्या दानाचे कार्य अखंडितपणे करत आहेत. जर्मन, फ्रेंच व इतर परदेशी भाषांचे शिक्षण बारामती सारख्या ठिकाणी सहज उपलब्ध होत आहे. एका छोट्याशा स्वप्नातून सुरू झालेला हा प्रवास आज तेरा वर्षांपर्यंत पोहोचला असून आजतागायद हजारो विद्यार्थी पानसरे दाम्पत्यांच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण घेत आहेत याचा बारामतीकरांना अभिमान वाटतो.  यावेळी नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या महिला व बालकल्याण विभागामार्फत बारामती नगरपालिका हद्दीतील महिलांसाठी मोफत स्पोकन इंग्लिश चे क्लासेस घेतले जातात हे क्लासेस अल्केमिस्ट स्पोकन इंग्लिश यांच्या अकॅडमी मध्ये होत असतात यावेळी कोर्स पूर्ण केलेल्या महिलांनाही प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ ज्योत्स्ना पानसरे मॅडम यांनी तर आभार श्री प्रकाश पानसरे सर यांनी मानले. सर्व विद्यार्थी पालक व हितचिंतक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article