बारामतीची कन्या स्वरांजली सतिश गायकवाड यांची महसूल सहाय्यकपदी निवड
Friday, April 18, 2025
Edit
बारामती: – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या परीक्षेतून बारामतीतील कन्या कु. स्वरांजली सतिश गायकवाड यांची महसूल सहाय्यक या पदासाठी निवड झाली आहे. स्वरांजली यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण म. ए. सो विद्यालय बारामती, पदवी शिक्षण (बी फार्मसी) सिंहगड कॉलेज पुणे येथून पूर्ण केले
"ध्येय समोर असेल तर कोणतीही परिस्थिती तुम्हाला तुमच्या ध्येयापासून लांब ठेवू शकत नाही तसेच जिद्द आणि चिकाटी असेल तर यशापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही "
कु.स्वरांजली सतिश गायकवाड यांनी कठोर मेहनत, चिकाटी आणि सातत्य यांच्या जोरावर हे यश मिळवले आहे. आई - वडिल, शिक्षकवृंद आणि मित्र परिवार यांचा या यशात मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचा बारामती टकारी समाजाच्या वतीने, सिद्दीविनायक विकास प्रतिष्ठान, क्षत्रिय तरुण मंडळ टकार कॉलनी बारामती व मा.उपनगराध्यक्ष अनिल गायकवाड यांनी व महिला भगिनीं यांनी त्यांचा फटाके वाजवुन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला,या निवडीमुळे समाजात आनंदाचे वातावरण झाले असून कु. स्वराजली यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.