दत्तात्रय गावडे यांना वारकरी भूषण पुरस्कार
Saturday, April 19, 2025
Edit
वडगाव निंबाळकर- प्रतिनिधी
बारामती तालुका वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष, कोऱ्हाळे बुद्रुक येथील उद्योजक दत्तात्रय बाळासाहेब गावडे यांना अहिल्यादेवी होळकर धर्मपीठाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वारकरी भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गुरुवारी (दि. १०) मुंबईत झालेल्या कार्यक्रमात तेलंगणाचे राज्यपाल विष्णूदेव वर्मा, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते गावडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी वारकरी सेवा संघाचे मुख्य मार्गदर्शक राजेंद्र सोळस्कर, तालुका उपाध्यक्ष
मोहन भांडवलकर, प्रसिद्धी प्रमुख निखिल सस्ते आदींची उपस्थिती होती.
वारकरी सेवा संघाचे राज्याचे अध्यक्ष ह.भ.प. राजाभाऊ चोपदार, पुणे जिल्हाध्यक्ष बोरगे महाराज व माजी अध्यक्ष बाळासो बारवकर यांच्या प्रेरणेतून हा पुरस्कार मिळाल्याची भावना गावडे यांनी व्यक्त केली. कोऱ्हाळे गावाबरोबरच बारामतीसारख्या प्रगत तालुक्यात वारकरी सांप्रदायाच्या प्रचार, प्रसाराचे कार्य गावडे यांच्याकडून केले जात आहे, असे वारकरी सेवा संघाचे सचिव दत्तात्रय भोसले यांनी सांगितले.